आज ३ एप्रिल, सर्वप्रथम स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना मृत्युदिनी विनम्र अभिवादन करून आपण आजच्या लेखाला सुरुवात करूया.
आजच्या या लेखात आपण बघणार आहोत की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतिहासात काय महत्त्व आहे ? आणि त्यांचा मृत्युदिन ऐतिहासिक दृष्ट्या का महत्त्वाचा आहे ?
छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन परिचय
जन्म आणि प्रारंभिक जीवन
शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या पोटी शिवाजी महाराजांचा 19 फेब्रुवारी 30 रोजी शिवनेरी दुर्गा वरती जन्म झाला.शहाजीराजांचा जन्म एका बलाढ्य सरंजामी राजा आणि कुर्मी कुळात झाला. राजमाता जिजाऊ या जाधवराव कुळात जन्मलेल्या अपवादात्मक प्रतिभावान स्त्री होत्या. शिवाजी महाराज यांच्या मोठ्या भावाचे नाव संभाजी राजे होते. संभाजी महाराज हे अधिकतर काळ शहाजीराजां सोबतच राहायचे.
शहाजीराजे यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव तुकाबाई होते. तुकाबाई या मोहिते घराण्यातील होत्या. तुकाबाईंच्या पोटी शहाजीराजांना एक पुत्र होता त्यांचे नाव व्यंकोजी राजे होते. शिवाजी महाराजांवरती त्यांच्या माता-पित्यांच्या खूप प्रभाव पडला.
शिवाजी महाराजांनी राजनीती आणि युद्धाची शिक्षा घेतली. त्यांना त्या काळातील घटना आणि वातावरण चांगल्या प्रकारे समजून यायला लागले. राजमाता जिजाऊ या अत्याधिक धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या आणि त्याचाच प्रभाव महाराजांवरती खूप चांगल्या प्रकारे पडला. आणि त्यातूनच राजमाता जिजाऊ यांच्या स्वराज्याच्या स्वप्नाची सुरुवात झाली. आणि शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे सोबत घेऊन स्वराज्याची शपथ घेतली.
शिवाजी महाराज आणि सईबाई यांचा विवाह
16 मे 1640 रोजी शिवाजी महाराज व सईबाई निंबाळकर यांचा विवाह झाला. सईबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील मुधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री होत्या. तंजावरचे पवार कुळ त्यातीलच हे निंबाळकर घराणे आहे. सईबाईंना तलवार बाजीची खूप आवड होती.
रांझ्याच्या ( गुजर ) पाटलाला शिक्षा
खेडेबाऱ्याच्या देशकुलकर्णी यांनी 28 जानेवारी 1646 रोजी लिहिलेल्या पत्रातून हा प्रकार आपल्यासमोर येतो. पत्रानुसार मौजे रांझे गावचा मोकदम म्हणजेच पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने बदअंमल केला. हा प्रकार महाराजांना कळल्यावर त्याला महाराजांसमोर हजर केले आणि त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याची मोकदमी म्हणजेच पाटील की जप्त केली. आणि त्याला चौरंगा केला.
स्वराज्याची शपथ / स्थापना
वयाच्या 16 व्या वर्षी शिवरायांनी सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. रायरेश्वराच्या मंदिरात तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, कान्होजी जेधे, बाजी पासलकर, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या आपल्या बारा मावळातील सवंगडी यांच्या साथीने 27 एप्रिल 1645 रोजी स्वराज्याची शपथ घेतली.
स्वराज्याचे तोरण
7 मार्च 1647 रोजी का आनंद खोऱ्यातील तोरणा दुर्ग जिंकून स्वराज्याचे तोरण उभारले. गड जिंकल्यानंतर, गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे महाराजांनी त्याचे नाव बदलून ‘प्रचंडगड’ असे ठेवले.
कोंढाण्यावर विजय
इ. स. 1647 रोजी महाराजांनी कोंढाण्यावर विजय प्राप्त केला. व याच साली मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याचे नाव राजगड ठेवण्यात आले.
पुरंदरचा किल्ला जिंकला
पुरंदर हा किल्ला आदिलशाही साम्राज्यामध्ये होता. तो किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1646 साली जिंकून हिंदवी स्वराज्यात सामील केला.
शहाजीराजांची सुटका
शहाजीराजांना आदिलशहा याने कैद केले होते. शहाजीराजांची सुटका होण्याचे असेही कारण आहे की, शहाजीराजांच्या दोन्ही पुत्रांनी आदिलशहाच्या फौजांचा केलेला पराभव. आपल्या फौजा शहाजीपुत्र संभाजी राजे व शिवाजी महाराज यांच्याकडून पराभूत झाल्याचे पाहून, आदिलशाही दरबाराकडे शहाजीराजांना मुक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नव्हता.
कर्नाटकातील बंगळूर व कदर्पी ही ठिकाणे आणि महाराष्ट्रातील कोंढाणा हा किल्ला आदिलशाही सरकारला परत करावा ,ह्या अटी दोन्ही महाराजांनी मान्य करत ती ठिकाणी आदिलशहाच्या ताब्यात दिली. 16 मे 1649 रोजी शहाजीराजांची आदिलशहाच्या कधीतून न सुटका केली.
ज्येष्ठ बंधू संभाजीराजांचे निधन
इ. स. 1656 रोजी शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांचे कनकगिरी येथे तोफेचा गोळा लागून निधन झाले.
जुन्नर या ठाण्यावर छापा
३० एप्रिल १६५७ छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जुन्नर या मोगली ठाण्यावर छापा टाकला…काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाला दक्षिणेतील सुभेदार या नात्याने पत्र पाठवले होते. औरंगजेबानेही शिवरायांना आपला खलिता पाठवलेला होता. त्या खलित्यात शिवरायांनी, “मोगलांचे अधिकारी” या नात्याने विजापूरकरांचा जो प्रदेश जिंकलेला आहे, त्याला संमती दिलेली होती! या संमती पत्राची तारीख आहे- २३ एप्रिल इ.स.१६५७. जुन्नर येथील मोगली अंमलदारांना वाटले की ज्या अर्थी शहजादाचे पत्र मिळाले त्या अर्थी शिवराय नक्की दिल्ली दरबाराचे निष्ठावान झाले. पण या गैरसावधपणाचा पुरेपूर फायदा घेऊन महाराजांनी स्वतः जुन्नरला छापा घातला व लक्षावधी रूपयांची संपत्ती गोळा केली.सभासद बखर मध्ये या स्वारीचे मोठे हृदयंगम वर्णन केले आहे ते असे- पुढे जुन्नर शहर मारिले. घोडे दोनशे पाडाव केले (जिवंत धरले).तीन लक्ष होनांची मत्ता, खेरीज कापडजिन्नस, जडजवाहीर, हस्तगत करून पुण्यास आले. मग अमदानगर शहर मारले. मोगलांशी मोठे युद्ध केले. सातशे घोडे पाडाव केले. हत्तीही पाडाव केले. द्रव्य बहुत सापडले. तेसमयी पागा बाराशे व शिलेदार दोन हजार जाहाले. अशी तीन हजार स्वारांची बेरीज झाली.
शंभू राजांचा जन्म
14 मे 1657 रोजी महाराणी सईबाईंच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला.
दुर्गाडी किल्ल्याची पायाभरणी
अपार द्रव्य साठा सापडलेल्या अशा या दुर्गाडी किल्ल्याची 24 ऑक्टोबर 1657 रोजी पायाभरणी केली. व याच साली पुरंदरचे किल्लेदार नेताजी पालकर यांना सरसेनापती पदावर बढती केली.
पोर्तुगालची तलवार खरेदी
5 मार्च 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 होन पोर्तुगीजांना देऊन पोर्तुगालची तलवार विकत घेतली.
पत्नी सईबाईंचे निधन
त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी १४ मे १६५७ रोजी संभाजी महाराजांना जन्म दिला. त्यानंतर सईबाईंची तब्येत बाळांतव्याधी मुळे खालावली. संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना ५ सप्टेंबर १६५९ रोजी महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला.

अफजल खान वध
अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची 10 नोव्हेंबर 1659 साली भेट झाली. ही भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी झालीया भेटीदरम्यान अफजलखानाने दगा केला त्याचवेळी शिवाजी महाराजांनी प्रतिउत्तर म्हणून वाघ नख्यांनी अफजलखानाचा कोथळाच बाहेर काढला.
त्यावेळी अफजलखान “दगा दगा” अशा आवाजात ओरडला. अफजलखानाच्या आवाजाने संपूर्ण सैन्य सावध झाले. त्यावेळी औरंगजेबाचा एक अंगरक्षक महाराजांवरती वार करण्यास पुढे आला असता, ‘जीवा महाले’ या महाराजांच्या शूर मावळ्याने त्याचा पूर्ण हातच शरीरा वेगळा केला. नंतर महाराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी अफजलखानाच्या सैन्यास पराभूत केले.
अशाप्रकारे या अफजलखानाचा महाराजांनी अतिशय चातुर्याने वध केला.
सिद्धीचा पन्हाळगडास वेडा
प्रतापगडावर अफजलखानाच्या मृत्यूनंतर अवघ्या 18 दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांनी 28 नोव्हेंबर 1659 रोजी पन्हाळा ताब्यात घेतला होता.
अफजल खान आणि रुस्तम जमान हे दोघेही विजापूर सल्तनत चे दोन प्रमुख सेनापती, शिवाजी महाराजांना पकडण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरले होते. शिवरायांच्या वाढत्या प्रभावाचा सामना करत असल्याने, या मोहिमेची जबाबदारी सिद्धी जोहर आणि त्याच्या मुघल आणि सिद्धी मित्रांवर आली.
२ मार्च 1660 रोजी सिद्धी जोहरने पन्हाळ्यास वेढा दिला. नेताजी पालकांनी व त्यांचे घोडेस्वार यांनी शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी आणि किल्ल्याच्या रक्षणासाठी शौर्याने लढा दिला. नेताजी पालकरांच्या या हल्ल्यांना नजुमानता, सिद्दी जोहरने पन्हाळा जिंकण्याचा निश्चितच केला.
महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी शौर्याने लढा दिला. परंतु त्यांची संख्या कमी होती. त्यातून विजापूरच्या सैन्याने संरक्षण तोडून किल्ल्यात प्रवेश केला. या दरम्यान महाराजांनी धोरणात्मक माघार घेऊन किल्ला शत्रूंच्या हाती केला व तेथून जाण्याचा निश्चय केला.
यावेळी शिवा काशीद या हुबेहूब शिवाजी महाराजांसारख्या दिसणाऱ्या मावळ्याने महाराजांसाठी आपल्या प्राण्याची आहुती दिली.
शिवा काशिदयाने महाराजांचे वस्त्र आणि दागिने घालून महाराजांचे रूप धारण केले. दोन पालख्या तयार केल्या गेल्या. एका पालखीमध्ये शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद अशा पालख्या निघाल्या. त्यावेळी शिवा काशिद यांची पालखी सिद्धीच्या फौजेला सापडली आणि त्याच चकमकेत दुसऱ्या पालखीतून शिवाजी महाराज हे सुखरूप विशालगडावर पोहोचले.
पुण्याच्या लाल महालावर छापा
लाल महाले हे शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचे पहिले निवासस्थान होते शिवाजी महाराजांनी 5 एप्रिल 1663 च्या रात्री लाल महालावर छापा मारला. त्यामध्येच लाल महालाचा सुभेदार शाहिस्ता खान याची शिवाजी महाराजांनी चार बोटे छाटली. नंतर शाहिस्ता खान पुण्यातून पळून गेला तो माघारी आलाच नाही. हाच दिवस आज शिवतेज दिन म्हणून ओळखला जातो.
शहाजी महाराजांचे निधन
येथे शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत असतानाच तिकडे कर्नाटकात होडीगरे येथे 23 जानेवारी 1664 रोजी शहाजी महाराजांचे निधन झाले. पूर्ण स्वराज्यावरती शोकाकळा पसरली.
पुरंदरची लढाई
पुरंदर ची लढाई ही मुघल आणि मराठ्यांची शौर्याची आणि अभिमानाची लढाई होती ही लढाई १४ एप्रिल 1665 मध्ये झाली.
पुरंदरचा तह
खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला करून पुरंदर माचीचा ताबा घेतला. त्या माचीवर मुरारबाजीचे आणि खानाचे घनघोर युद्ध झाले. तेथेच मुरारबाजींना मरणोगती प्राप्त झाली आणि पुरंदर ही पडला. हे कळताच शिवाजी महाराजांनी जयशिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले.
अतिशय नुकसान सहन केल्यानंतर शिवाजी महाराजांनी 11 जून 1665 रोजी पुरंदरच्या तहावर स्वाक्षरी केली. या तहानुसार, शिवाजी महाराजांनी आपले 23 किल्ले मोघलांना सोपवले आणि त्यांचे अधिपत्य ही स्वीकारावे लागले. त्यांना 12 किल्ले बक्षीस म्हणून ठेवण्याचे चे आणि मुघलांचा दास शासक म्हणून राहण्याची परवानगी देण्यात आली.
गड आला पण सिंह गेला
4 फेब्रुवारी 1670 रोजी झालेल्या कोंढाण्याच्या लढाईत उदयभान राठोड या राजपूत शिलेदाराशी लढताना वीरगती प्राप्त झालेल्या सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ हे वाक्य येते.
आपल्या मुलाचे लग्न तोंडावर आले असताना देखील सुभेदारांनी कोंढाण्याच्या लढाईचा विडा उचलला. त्यावेळी ते बोलले की “आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं” . त्या लढाईत तानाजी मालुसरे यांनी व मावळ्यांनी अतिशय शर्तीने झुंज दिली. पण अखेरीस गड तर आला पण सिंह गेला. सुभेदारांना वीरगती प्राप्त झाली. त्या वेळचे महाराजांचे हे शब्द आहेत की “गड आला पण सिंह गेला”.
राजाराम महाराजांचा जन्म
शिवाजी महाराज यांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई यांच्या पोटी 24 फेब्रुवारी 1670 रोजी राजाराम महाराजांचा जन्म झाला.
पन्हाळ्यावर विजय
६ मार्च 1673 मध्ये कोंडाजी फर्जंद यांच्याबरोबर सैन्य पाठवून छत्रपती शिवाजी महाराजांनी भेदनीतीचा उपयोग करून परत किल्ला ताब्यात घेतला.
शिवरायांचा राज्याभिषेक
भारताच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाचा प्रसंग म्हणजेच छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक. 6 जून 1674 रोजी शिवरायांनी स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा केली. त्यांचा राज्याभिषेक रायगडावरती गागाभट्ट यांच्या हस्ते करण्यात आला.
राजमाता जिजाऊंचे निधन
शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला केवळ बारा दिवस झाले असतानाच, रायगडाजवळील पाचाड या गावात 17 जून 1674 रोजी वयाच्या 77 व्या त्यांचे निधन झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक
जिजाऊंचे निधन झाले नंतर मराठ्यांनी निश्चल पुरी गोस्वामी या पुजाराला बोलवले. त्या पुजार्याने असे सांगितले की, मूळ राज्याभिषेक अशुभ ताऱ्यांखाली झाला होता. दुसरा राज्याभिषेक करणे गरजेचे आहे. म्हणून 24 सप्टेंबर 1674 रोजी दुसरा राज्याभिषेक महाराजांनी करून घेतला.
त्यामुळे, ज्यांचा अजूनही विश्वास होता की, पहिल्या राज्याभिषेकाला महाराज पात्र नव्हते त्यांना कमी, त्यांना कमी प्रतिस्पर्धी अतिरिक्त सोळा पार पाडून राज्यभिषेक केला.
शिवरायांचे निधन 3 एप्रिल १६८०
३ एप्रिल 1680 रोजी काळाने स्वराज्या वरती घाला घातला. वयाच्या 50 व्या वर्षी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण वादग्रस्त आहे.
पोर्तुगीज भाषेतील बिब्लिओटेका नॅसिओनल डी लिस्बोआ या समकालीन दस्ताऐवजात मृत्यूचे कारण अँथ्रॅक्स आहे. आणि ब्रिटिश नोंदी सांगतात की बारा दिवस आजारी राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर शिवाजी महाराजांच्या चरित्रातील सभासद बखर चे लेखक कृष्णाची अनंत सभासद यांनी, मृत्यूचे कारण ताप आहे असे सांगितले आहे.
शिवाजी महाराजांच्या पत्नींपैकी निपुत्रिका व सर्वात लहान असणारे पुतळाबाई यांनी त्यांच्या अंत्यसंस्कारात उडी मारून सती गेल्या.
समारोप
महाराज गडपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्टवधानजागृत अष्टप्रधानवेष्टित न्यायालंकारमंडित शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत राजनितिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.
FAQ’s
- छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी आणि कसा झाला?
- शिवाजी महाराजांच्या जीवनात रायगड किल्ल्याचे काय महत्त्व होते?
- शिवाजी महाराजांची पुण्यतिथी कधी साजरी केली जाते?
- शिवाजी महाराजांनी कधी औरंगजेबाशी थेट सामना केला होता का?
- त्याच्या युद्ध धोरणात कोणत्या खास रणनीती होत्या?
- शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर त्यांच्या साम्राज्याचे काय झाले?
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय सुधारणा कोणत्या होत्या?
- आजच्या काळात शिवाजी महाराजांचा वारसा कसा जिवंत आहे?
- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला?
- पन्हाळा किल्ला कधी जिंकला?
- पन्हाळ्याला कोणी वेढा घातला?
- राजाराम जी का जन्म कब और कहाँ हुआ था?
- रायबा मालुसरे कोण आहेत?
- तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी कधी आहे?
- पुरंदरचा तह कधी आणि का झाला?
- शिवरायांचा मृत्यू कधी झाला?
- शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना कोणत्या होत्या?