प्रस्तावना

आपल्या भारताचा इतिहास हा महान व्यक्तींच्या कार्याने समृद्ध असा झालेला आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वोच्च स्थानावर आहे. अस्पृश्यता, असमानता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध आजन्म संघर्ष करून भारताच्या सामाजिक क्रांतीला दिशा देणारे, संविधाननिर्माते आणि मानवतावादाचे प्रणेते म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे देहावसान झाले आणि हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. हा दिवस फक्त शोकाचा नसून हा दिवस स्मरण, कृतज्ञता आणि त्यांच्या विचारांचे नव्याने स्मरण करून संकल्प करण्याचा दिवस आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास—संघर्ष ते शिखर
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू (मध्य प्रदेश) येथे झाला. दारिद्र्य, वर्णव्यवस्था, सामाजिक तिरस्कार आणि भेदभावाची सर्व संकटे त्यांनी लहानपणापासून झेलली आहेत. शाळेत पाण्याच्या घड्याला हात देखील लावू देत नव्हते, वर्गात बसू न देणे, शाळेतील उच्चवर्णीय विद्यार्थ्यांकडून अपमान—हि सर्व परिस्तिथी बाबासाहेबांनी अनुभवली आहे. त्यांनी एवढा त्रास सहन करून शिक्षणाची जिद्द सोडली नाही कारण शिक्षणाच्या शक्तीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. आणि आजच्या युवांवरती हाच आंबेडकर विचार खूप मोठा प्रभाव पाडत आहे.
त्यांनी कोलंबिया विद्यापीठ (अमेरिका) आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (इंग्लंड) या दोन कॉलेजांमधून उच्च शिक्षण घेतले. बॅरिस्टर पदवी मिळवूनही त्यांनी केवळ स्वतःच्या करिअरची वाट न धरता शोषित-वंचित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्य अर्पण केले. “शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा,” हा संदेश त्यांनी समाजाला दिला. हा आंबेडकर विचार आजही अनेकांना प्रेरणा देतो. बाबासाहेबांचा जीवनप्रवास हा संघर्षातून यश संपादन करण्याचा सर्वोच्च आदर्श आहे.

आपण या बाबासाहेबांच्या वाक्याचा अर्थ समजून घेऊन याच नुसार आपण चालले पाहिजे. आपण प्रत्येक मुद्यात कुठे न कुठे चुकी करत आहोत हि गोष्ट प्रत्तेकाने समजून घ्या. का? कारण बाबासाहेब म्हणतात शिका—आपण शिक्षण घेतो. नंतर बाबा म्हणतात संघटीत व्हा—आपली संघटनाच्या नावाने बोंब आहे. आपण काय करतो—आपण शिक्षण घेतो आणि लगेच संघर्ष करायला चालू करतो पण, जर आपले संघटन नसेल तर आपल्या संघर्षाला बळ येणार नाही. म्हणून माझ्या सर्व बांधव आणि भगिनींनो, शिक्षण घ्या, एकजूट व्हा आणि न्यायासाठी/हक्कासाठी पेटून उठा.“शिका , संघटीत व्हा, आणि संघर्ष करा.” -डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संविधान निर्मितीतील बाबासाहेबांचे ऐतिहासिक योगदान
भारतीय स्वातंत्र्यानंतर संविधान तयार करण्यासाठी संविधान समितीची स्थापना करण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांनी भारतीय संविधानात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचे तत्त्व जितक्या सखोलतेने आणि सर्वांना समान हक्क देण्याच्या दृष्टीने समाविष्ट केले ते जगभर आदर्श मानले जाते. अशी हि भारताची राज्यघटना जगातील प्रथम क्रमांकाची लिखित राज्यघटना आहे.
- समाजातील सर्व घटकांना समान न्याय
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सर्वांना समान न्याय मिळवून दिला. प्रत्तेक व्यक्ती, घटक हे समान आहेत, या बाबतीतले अधिकार बाबासाहेबांनी संविधानात नमूद केले.
- धर्मस्वातंत्र्य आणि महिलांना समान हक्क
- प्रत्तेकाला आपले धर्म स्वातंत्र्य बाबासाहेबांनी संविधानात मिळवून दिले. ज्या भारतात महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात होती, त्याच भारतात बाबासाहेबांच्या संविधानाने महिलांना समान वागणूक दिली.
- अस्पृश्यता गुन्हा घोषित
- संविधानानुसार अस्पृशता मानने हे गुन्हा आहे असे ठरवले. या देशातील अस्पृशता नष्ट करण्यात बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे.
- शिक्षणाचा हक्क आणि दुर्बल घटकांसाठी आरक्षण व्यवस्था
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक असे व्यक्तिमत्व आहे ज्याने कोणत्या एका जातीचा , व्यक्तीचा , समजाचा विचार न करता संपूर्ण भारतीय जनतेचा विचार कारण संविधानामध्ये आरक्षण लागू केले. वंचित , दलित , पिडीत , शोषित, घटकांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला होता. आधीच्या वर्ण व्यवस्थेने या दलित वर्गाला शुद्र वर्गाला शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. म्हणून दलितांचे कैवारी बाबासाहेब यांनी सर्वांना शिक्षणाचा हक्क प्राप्त करून दिला. आणि भारतातील दुर्बल घटकांसाठी आरक्षण हे लागू केले.
भारतीय लोकशाहीची मजबूत पायाभरणी बाबासाहेबांच्या विचारांवर आजही उभी आहे. संविधान निर्मिती आणि त्यातील बाबासाहेबांचे योगदान याचा सखोल अभ्यास करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
भारतीय संविधानाची निर्मिती – एक सखोल अभ्यास: महापरिनिर्वाण दिन 2025 – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी जीवन व योगदानाचा सविस्तर इतिहास
सामाजिक क्रांती आणि न्यायासाठी अखंड संघर्ष
बाबासाहेबांचा संघर्ष फक्त राजकीय नव्हता—तो मानवी हक्कांसाठीच्या अर्थशास्त्राच्या गतिक लढ्याचा भाग होता. माणसाला माणूस म्हणून वागणूक दिली जात नव्हती, त्याचसाठी बाबासाहेबांचा हा संघर्ष होता आणि इथून पुढेही तो आपण तेवत ठेवला पाहिजे. या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने आपण बाबासाहेबांचे विचार अंगीकृत करून संकल्प करू.
त्यांनी सुरुवातीपासूनच खालील विचार मांडले:
- समाजातील सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे.
- शिक्षण प्रगतीचा पाया आहे.
- स्त्री-पुरुष समानतेशिवाय समाजाचा विकास अशक्य आहे.
- दडपशाहीविरुद्ध कायद्याची सत्ता असली पाहिजे.
- न्यायाशिवाय लोकशाही मृत आहे.
त्यांनी कामगारांचे कामाचे तास, वेतन, आरोग्य व सुरक्षा यासंबंधी ऐतिहासिक कायदे करण्यास प्रोत्साहन दिले. हा बाबासाहेबांचा संघर्ष आपण विसरता कामा नये. त्यांच्या या अथक संघर्षाला आपण या महापरिनिर्वाण दिनी (6-dis-2025) त्यांना त्रिवार अभिवादन करू आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपला व आपल्या समाजाचा उद्धार करू.
बौद्ध धम्म स्वीकार – परिवर्तनाची ऐतिहासिक घोषणा
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीत लाखो अनुयायांसह बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे. त्यांचे धर्मांतर हे भारतीय इतिहासातील एक अहिंसक आणि वैचारिक क्रांतीचे उदाहरण मानले जाते. त्यांनी पंचशील आणि त्रिशरण स्वीकारून मानवतावादी आणि तर्कसंगत मूल्यांवर आधारित जीवनपद्धतीचा स्वीकार केला. त्यांनी बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करून या मनुवादी व्यवस्थेचा तिरस्कार केला.

बौद्ध धम्माच्या आधारावर:
समता
प्रज्ञा
शील
करुणा
अहिंसा
विचारस्वातंत्र्य
बंधुता
यावर आधारित समाजरचना करण्याचा त्यांनी संदेश दिला. या मूल्यांना अंगीकृत करून आपण आपले जीवन व्यतीत करा असा मार्ग आपल्याला बाबासाहेब देऊन गेले.
महापरिनिर्वाण दिन – इतिहास, कारण आणि महत्त्व
६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. मुंबईतील चेतना भूमी, दादर येथे त्यांचे अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर दरवर्षी ६ डिसेंबर हा दिवस कोट्यवधी अनुयायी आणि समाजातील सर्व घटकांच्या स्मरणार्थ महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करतात.
🔹 हा दिवस फक्त दुःखाचा दिवस नाही, तर त्यांच्या विचारांना जीवनात उतरवण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.
🔹 चेतना भूमी येथे लाखो लोक येऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करतात.
🔹 भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कार्यक्रम, व्याख्याने आणि मानवतावादी उपक्रम घेतले जातात.
आजच्या भारतात बाबासाहेबांचे विचार का अधिक आवश्यक?
आजच्या समाजात —
- शिक्षण, आरोग्य आणि रोजगारातील विषमता
- आज बाबासाहेबांचे विचार हे अधिक महत्त्वाचे आहेत कारण पुनः एकदा आपल्या अधिकारांचा बळी हा गेला नाही पाहिजे. कारण बाबासाहेबांनी जे आपल्याला साध्य करून दाखवले आहे, त्या मार्गावरती आपण चाललो तर आणि तरचं आपला उद्धार हा होईल. भारताची सद्य सद्यस्थिती आपण सर्वजण बघत आहोत. शिक्षण हे डोक्यात टाकले जात आहे, आरोग्याची नीट सोय सरकारद्वारे केली जात नाही, आणि रोजगार निर्मिती होत नाही. या कारणांनी भारत हा मागे चालला आहे. त्यासाठी आजच्या भारतात बाबासाहेबांचे विचार अधिक आवश्यक आहेत.
- जातीय आणि धार्मिक द्वेष
- जाती-जातींमध्ये द्वेष निर्माण केला जात आहे, धर्माच्या नावावर राजकारण हे केले जात आहे. धार्मिक तेढ हि निर्माण केली जात आहे. यासाठी आजच्या भारतात बाबासाहेबांचे विचार अधिक आवश्यक आहेत.
- आर्थिक असमानता
- रोजगार नसल्याने आर्थिक संतुलन हे कोसळत आहे. इथले प्रस्थापित सत्ताधारी सुशिक्षित नसल्या कारणाने आर्थिक असमानता वाढली आहे. यासाठी आजच्या भारतात बाबासाहेबांचे विचार अधिक आवश्यक आहेत.
- महिलांवरील अत्याचार
- सध्या आपण पाहत आहात की दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार हा वाढत चालला आहे. इथले सत्ताधारी पक्ष त्यांचे व्यवस्थित निकरान करत नाहीत. आपण बघत आहोत की लहान लहान चिमुकल्यांवर नराधम तुटून पडत आहेत. या यासाठी प्रत्येक व्यक्तीने सुशिक्षित असणे गरजेचे आहे. जर प्रजाच अशिक्षित असेल, तर राजा हा अशिक्षितच होईल. आणि याचसाठी आजच्या भारतात बाबासाहेबांचे विचार अधिक आवश्यक आहेत.
या समस्या अजूनही अस्तित्वात आहेत. अशा परिस्थितीत बाबासाहेबांचे विचार आजही मार्गदर्शक ठरतात, आणि प्रत्येकाने बाबासाहेब वाचणे आवश्यक आहे. बाबासाहेब म्हणतात—
बाबासाहेबांचा संदेश – “समाजात धर्म असेल तर तो मानवतेचा असावा.”
ज्ञान, विज्ञान, समता आणि न्याय यांची विचारधारा समाजाला पुढे नेते.
निष्कर्ष
महापरिनिर्वाण दिन हा रडण्याचा आणि अश्रू गाळण्याचा दिवस नाही आहे. हा दिवस बाबासाहेबांनी सोडून गेलेल्या विचार, आदर्श आणि तत्त्वांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. हा दिवस सांगतो की प्रगतीचा मार्ग शिक्षण, समता आणि बंधुत्वातूनच जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि कार्य पुढील पिढ्यांना उर्जित प्रेरणा आणि न्यायपूर्ण भारताचे स्वप्न देत राहील.
इतिहासिका अश्याच ऐतिहासिक, राजकीय, भौगोलिक बाबींवरील माहिती देण्यासाठी सदैव सज्ज राहील. आपण अश्याच माहितीपूर्ण आणि अभ्यासू दृष्टीने परिपूर्ण होण्यासाठी आमच्याशी जोडलेले राहा. अधिक जाणून घ्या.
https://itihasika07.com/: महापरिनिर्वाण दिन 2025 – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी जीवन व योगदानाचा सविस्तर इतिहास❓ FAQ – महापरिनिर्वाण दिन
| प्रश्न | उत्तर |
|---|---|
| महापरिनिर्वाण दिन कधी साजरा केला जातो? | दरवर्षी ६ डिसेंबर रोजी |
| कोणाच्या स्मरणार्थ महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो? | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
| महापरिनिर्वाण दिन कुठे साजरा केला जातो? | दादर, मुंबईतील (चेतना भूमी) तसेच संपूर्ण जगभर |
| बाबासाहेबांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला? | बौद्ध धर्म |
| बाबासाहेबांना भारतरत्न कधी प्रदान करण्यात आला? | १९९० साली (मरणोत्तर) |
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल,
▶ Itihasika07 ला Follow करा
▶ ही पोस्ट इतरांपर्यंत पोहोचवा
▶ आणखी अशा प्रेरणादायी कथा वाचा
