
Cyber Crime म्हणजे काय? थोडक्यात पण खऱ्या जिवनाला भिडणारं समज
सायबर क्राईम म्हणजे इंटरनेट, मोबाईल किंवा डिजिटल साधन वापरून केलेला गुन्हा.
एवढंच नाही… पण त्याचा त्रास मात्र प्रचंड.
🔹 एखाद्याचे फोटो घेऊन चुकीचा वापर
🔹 पैशांची ऑनलाईन फसवणूक
🔹 WhatsApp/Instagram/Facebook हॅक
🔹 बनावट प्रोफाईल
🔹 मुलींचे फोटो एडिट करून बदनामी
🔹 Loan App ची धमकी
🔹 Online गेमिंगमध्ये पैसे ओढून घेणे
🔹 ATM / Debit Card / UPI Fraud
आज घराघरात स्मार्टफोन आहे पण सायबर सेफ्टी मात्र कडेला आहे.
आणि बस्स… गुन्हेगारांना हवी ती संधी मिळते.
“आपल्या लोकांना सांगणारच आहे”
गावाकडचा माणूस अजूनही पोलिस स्टेशन, कोर्ट, कायदे… सगळ्यांपासून दूर राहतो.
“अहो, पोलिस त्रास देतील… थांबा, आपणच समजून घेऊ”
असं म्हणत लोक गप्प राहतात.
पण हे चूक आहे.
सायबर क्राईममध्ये जितक्या लवकर कंप्लेंट तितकी जास्त शक्यता की केस ट्रेस होईल.
आणि मी प्रामाणिकपणे सांगायचं तर…
मी itihasika07 वर जेव्हा awareness content टाकतो… तेव्हा एकच हेतू – आपले लोक जागे व्हावेत.
सर्वात महत्वाची गोष्ट – “होईल का? नाही?” असा विचार सोडा!
खूप लोक विचारतात,
“Online complaint केल्यावर खरंच काही होतं का?”
“सरकार खरंच action घेते का?”
“हे फक्त दाखव्यासाठी आहे का?”
सरळ उत्तर –
हो… action घेतात.
हो… government seriously handle करते.
हो… complaint केली तर result मिळतो.
फक्त complaint करायला माहिती हवी.
आणि ती मी आता अगदी परफेक्ट सांगतो…चला तर मग-
Cyber Crime Complaint Online कशी करावी? (स्टेप बाय स्टेप)

Step 1 – सर्वात आधी वेबसाईट लक्षात ठेवा
– www.cybercrime.gov.in
ही भारत सरकारची अधिकृत वेबसाइट आहे.
ही वेबसाइट Ministry of Home Affairs ची असून genuine आहे.
इथे complaint केली की ती थेट संबंधित cyber police कडे जाते.
Step 2 – दोन प्रकारच्या तक्रारी असतात
या वेबसाइटवर complaint करताना दोन category असतात:
१. Women & Children संबंधित गुन्हे (विशेष संरक्षण)
उदा. – अश्लील फोटो, मॉर्फिंग, बदनामी, धमकी इत्यादी
या तक्रारी गोपनीय आणि sensitive हँडल केल्या जातात.
२. सर्वसाधारण Cyber Crime Complaint
उदा. – UPI fraud, Bank fraud, Social Media Hacking, Phishing etc.
म्हणजेच, तुम्हाला कोणत्या प्रकारचा गुन्हा झाला आहे ते बघून category निवडायची.
Step 3 – लॉगिन करून तक्रार भरा
✔️ तुमचा Mobile नंबर
✔️ OTP
✔️ Basic माहिती
यानंतर complaint form उघडेल.
तिथं तुम्हाला हे भरायचं:
काय घडलं?
कधी घडलं?
कुठे घडलं?
कोणत्या app / site वर?
किती नुकसान झालं?
इथे शक्य तितकं clear लिहा. आणि खरं लिहा. कोणती ही माहिती लपवू नका.
काक्णाक, घोळ, लपवाछपवी नको.
Step 4 – पुरावे जोडणे खूप महत्वाचे
Screenshot
Transaction ID
Chat proofs
फोन कॉल रेकॉर्डिंग (असल्यास)
फोटो / Link
पुरावा असेल तर केस वेगाने पुढं जाते. जेवढे पुरावे तेवढ fast काम.
Step 5 – Complaint Submit करा
Complaint submit केली की तुम्हाला एक Acknowledgment Number मिळतो.
त्याला Complaint ID पण म्हणतात.
तो सुरक्षित ठेवा.
याच नंबरवरून पुढं status कळतं. म्हणजे आपली case कुठपर्यंत हाताळली गेली किवा काय process चालू आहे.
Step 6 – जवळच्या Cyber Police कडून संपर्क येतो
तुमच्या complaint वरून संबंधित पोलीस स्टेशन किंवा Cyber Cell तुमच्याशी Contact करते.
कधी कधी फोन, कधी मेल, कधी सरळ बोलावतात. मग आपल्याला तिथ जाऊन किवा call msg mail जे येईल त्यावर निट सगळ सांगाव लागत.
Step 7 – Result मिळतो पण “धीर” हवा
सायबर केस लगेच solve होत नाही.
गुन्हेगार कधी दुसऱ्या राज्यात, कधी विदेशातही असतो.
त्यासाठी प्रक्रिया असते.
पण सरकार काम करते, हि खात्री ठेव.
माझ्या सोबतची एक घटना
माझा एक पुण्यातला मित्र आहे. तो देखील Online काम करतो.
Facebook वर त्याचं account hack झालं. Hacker त्याच्या मित्रांना मेसेज करायला लागला की –
“पैसे उधार पाठव, परत करतो…” अस तस बोलत होता.
२ जणांनी तर पैसे पण पाठवले!
तो खूप घाबरला. आता काय करावं? अस तस टेन्शन घ्यायला लागला.
मी सांगितलं – तू थेट complaint कर cybercrime.gov वर.
मग त्याने complaint केली.
१५ दिवसात account परत आणि hacker trace.
म्हणून सांगतो…
भीऊ नका – आवाज उठवा.
जर त्यातही काही अडचण वाटली तर, काही वेळा FIR पण करावी लागते.
FIR म्हणजे काय? आणि ती Step by Step कशी दाखल करायची? यावर मी वेगळा सविस्तर लेख लिहिलाय. जरूर वाचा — तुमच्या कामात खूप उपयोग होईल.
“FIR म्हणजे काय? FIR कशी दाखल करावी? (Step by Step Guide)”
गावाकडची एक खरी भावना
आपल्या गावात लोक अजूनही असं समजतात –
“online केलं तर कोण बघतं का?”
पण आज India खूप पुढं गेलाय.
Digital Police, Cyber Experts, Tracking System – सगळं आहे.
फक्त आपण complaint केली पाहिजे.
हे कायम लक्षात ठेवा
OTP कुणालाही सांगू नका
Bank PIN, CVV share करू नका
Unknown link क्लिक करू नका
“आपण लकी ड्रॉ जिंकलात” – हे 100% फसवणूक
Loan App ला फोटो/कॉन्टॅक्ट access देवू नका
माझं Personal Opinion
सायबर क्राईम म्हणजे फक्त पैशाची फसवणूक नाही…
कधी कधी मानहानी, मानसिक त्रास, कुटुंबात खळबळ, आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं.
म्हणून awareness खूप महत्वाची.
आणि हेच काम मी itihasika07 वरून नेहमी करत राहणार.
कारण आपले लोक safe असावेत – हीच माझी खरी भावना.
ITIHASIKA07 तुमच्यासाठी काय करतं
✔️ itihasika07 – माहिती देत राहील
✔️ itihasika07 – लोकांना जागृत करत राहील
✔️ itihasika07 – खरी, प्रामाणिक माहिती देत राहील
✔️ itihasika07 – तुमच्यासोबत कायम उभा राहील
शेवटच सांगतो…
आज सायबर गुन्हेगार हुशार आहेत…
पण भारतातील लोक अजूनही विश्वासू.
म्हणून आपल्याला सावध राहावं लागणार.
फसवणूक झाली तर गप्प बसायचं नाही.
Cyber Crime Complaint Online जरूर करा.
लक्षात ठेवा –
आपण गप्प = गुन्हेगार ढीट
आपण जागे = देश सुरक्षित
FAQs
Q1. Cyber Crime Complaint Online कुठे करावी?
Cyber Crime Complaint भारत सरकारच्या cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाइटवर करता येते.
Q2. Online complaint केल्यावर action घेतात का?
हो, complaint संबंधित Cyber Police कडे जाते आणि त्यानुसार तपास सुरू होतो.
Q3. Cyber Crime Complaint साठी कोणते documents लागतात?
Screenshot, Chat proofs, Transaction ID, account details, fraud proof असे पुरावे आवश्यक असतात.
Q4. महिलांसाठी वेगळी सुविधा आहे का?
हो, महिलांसाठी आणि मुलांसाठी विशेष आणि confidential complaint विभाग उपलब्ध आहे.
Q5. Bank fraud किंवा UPI scam झाल्यास काय करावे?
तात्काळ bank ला कळवा आणि लगेच cybercrime.gov.in वर complaint नोंदवा.
Q6. Police station ला जायलाच लागतं का?
अनेक केस Online handle होतात; पण गरज असल्यास Cyber Police संपर्क करते.
जर तुम्हाला हा लेख उपयोगी वाटला असेल तर
तुमच्या मित्रांना, कुटुंबाला, वाचन गटाला share करा.
कारण माहिती म्हणजे शक्ती.
आणि आपण सगळे itihasika07 परिवार त्या शक्तीचे वाहक आहोत.
▶ Itihasika07 ला Instagram Follow करा
▶ Itihasika07 ला facebook Follow करा
▶ Itihasika07 ला pinterest Follow करा
▶ Itihasika07 whats app channel Follow करा
