1 जानेवारी 2026 ला मी पाहिलेला भीमा कोरेगाव – माझा प्रत्यक्ष अनुभव, इतिहास, भावना आणि जाणिवा | ITIHASIKA07

1 जानेवारी 2026 भिमाकोरेगाव प्रत्यक्ष अनुभव Marathi-ITIHASIKA07
1 जानेवारी 2026 – भीमा कोरेगाव Vijay Stambh समोर उभा राहताना जाणवलेला स्वाभिमानाचा क्षण.

Table of Contents

हा फक्त प्रवास नव्हता, ही एक मनाची यात्रा होती…

1 जानेवारी 2026…
कॅलेंडर बदललं होतं, पण काही गोष्टी कायम होत्या – इतिहासाची जड स्मृती, समाजाची ओळख, आणि आपल्या अस्तित्वाशी जोडलेली एक भावना.
या दिवशी मी पहिल्यांदा नाही, पण खऱ्या अर्थाने मनापासून भीमा कोरेगावला गेलो.

गेलो कारण curiosity होती…
गेलो कारण समाज समजून घ्यायचा होता…
गेलो कारण इतिहास “केवळ पुस्तकातला विषय” राहू नये… तो पाहायला, अनुभवायला आणि जगायला हवा होता.

जेव्हा मी ITIHASIKA07 वर इतिहासाविषयी लिहितो, तेव्हा फक्त पुस्तकं वाचून किंवा गूगल करून नव्हे, तर स्वतः अनुभवून लिहायचं ठरवलेलं. म्हणूनच हा प्रवास माझ्यासाठी वेगळा होता. मला माहिती होतं—हा दिवस माझ्या आयुष्यातील केवळ एक घटना ठरणार नाही… तर एक जाणीव, एक धडा, आणि एक आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण ठरणार आहे.


प्रवासाची सुरुवात – “मनात भावना, डोळ्यांत उत्सुकता…”

वर्षाची सुरुवात म्हणजे शौर्यदिनाचे स्मरण करून. म्हणून विचार केला की, अस पुस्तकी ज्ञान घेण, इतिहासाचा अभ्यास करणे तर ठीक आहे. पण इतिहास हा अनुभव रुपी अभ्यासणे हे देखील तीवढेच महत्वाचे आहे.

मग काय,

उचलला फोन आणि लावला मोठ्या भावाला,

भावाला बोललो, आपल्याला भिमकोरेगाव ला जायचं आहे. माझा भाऊही तेवढाच इतिहास अनुभवण्यासाठी उत्सुक,

मग काय, बोलनं झाल आणि मग ठरलं, वर्षाच्या सुरुवातीचा दिवस हा ५०० महार शूर सैनिकांना अभिवादन करण्यात आणि वास्तव समजून घेण्यास घालवायचा.

१ जानेवारी २०२६ ची सकाळ. सगळी कामे उरकली. मी आणि माझे २ भाऊ आम्ही निघालो इतिहास रचणाऱ्या ५०० महार सैनिकांच्या अभिवादनाला.
गाडी सुरू केली आणि मनात विचारांची गर्दी सुरू झाली.

तिथे काय दिसेल?
लोक कसे असतील?
वातावरण कसं असेल?
आणि सर्वात मोठं – माझ्या मनात काय बदल होईल?

रस्त्यावर पुढे जाताना छोट्या ढाब्यांवर लोकांची गर्दी दिसत होती.
कोणी चहा घेत होते…
कोणी झेंडा हातात धरून पुढे जात होते…
कोणी गाणी लावून उत्साहात होते…
तर काही शांत… गंभीर… विचारात मग्न.

भीमसैनिकांचा राडाच लई वेगळा हो.

जस-जसं मी पुण्यातून येरवडा ओलांडून नगर च्या महामार्गाला लागलो तसं चौका-चौकात भीमसैनिक जल्लोष करताना दिसत होते. तर कोठे-कोठे भीमसैनिकांनी अभिवादनाला येणाऱ्या अनुयायांसाठी मोफत अन्न दानाची व्यवस्था तर कोणी पाणी तर कोणी पुस्तके अस बरच काही. हे बघून माझ्या मनात अतिषक भावनिक उर्जा निर्माण झाली. खरच लोक इतिहासाला जाणून एवढ सगळ करतात. समाजासाठी फुल नाही फुलाची पाकळी तरी देतात. हे भिमसैनिकांचे फक्त प्रेम नाही तर… आंबेडकरवादी आणि महारांच्या, आपल्या स्वतःच्या इतिहासाची असलेली भावनिक ओढ आहे.

मग आम्ही तिथून पुढे सरसावत, जल्लोष करत, शौर्याची आठवण करत, लोकाच्या भावना बघत, आसपासचे वातावरण बघत शेवटी कोरेगाव भीमा च्या जवळ गेलो.

आसपास ४ ते ५ किलोमीटर लांबीवर २-४ चाकी गाड्यांसाठी वाहनस्थळ व्यवस्था केली होती. आम्ही तिथे गाडी लाऊन पुढे स्तंभाच्या दिशेने निघालो.

अबब !

काय ती गर्दी, काय ते लोक. जिथपर्यंत डोळ्याची नजर जाईल तिथपर्यंत लोक नजरेपुढून जात न्हवते.
“इतक्या लोकांसाठी, इतक्या भावना सांभाळण्यासाठी ही जागा किती काही पेलत असेल ना?” हा प्रश्न माझ्या समोर उभा राहिला.


पहिली नजर – “Vijay Stambh समोर उभा राहिलो आणि काही क्षण शब्दच सुटले…”

Vijay Stambh जवळ पोहोचलो…
गर्दी असली तरी एक अनोखा चित्र, लोकांच्या भावना, लोकांच्या मनात असलेली एक वेगळी भावना हा अनुभव मी खूप जवळून अनुभवला आहे.
खरच लोक भावनिकतेने वेडे आहेत आपल्या इतिहासासाठी.

लोकांमध्ये मी जे पाहीलं ते फक्त इतिहासाप्रती असलेले प्रेमचं नव्हत,
तर होता आदर, श्रद्धा आणि अभिमानाचा स्पर्श.

ज्यावेळी मी त्या स्मारकासमोर उभा राहिलो…
तेव्हा असे वाटले की 1818 चा संपूर्ण इतिहास माझ्या डोळ्यांसमोर उभा आहे.

हे सगळं दृश्य बघून माझ्या मनात एकच आला…

ज्यांच्या शौर्याने इतिहासाला नवीन वळण दिलं,
ज्यांच्या रक्ताने स्वाभिमानाचं स्वप्न जिवंत केलं,
संपविली पेशवाई , इतिहासात नाव ज्यांनी लिहिलं,
अश्या या ५०० महारांच्या पराक्रमाला शतशः मी वंदन केलं!

आणि खरंच… त्या क्षणी शब्द नव्हते, फक्त भावना होत्या.

२०८ व्या शौर्यादिनाची एक झलक-ITIHASIKA07
२०८ व्या शौर्यादिनाची एक झलक-ITIHASIKA07

इतिहासाशी जुळलेली नाळ – “1818 ते 2026… वेळ बदलली, पण भावना तशाच”

1818 साली इथे झालेलं युद्ध फक्त लढाई नव्हती…
ती एक ओळख सिद्ध करण्याची लढाई,
कुचंबनितांना आवाज देणारी लढाई,
आणि “आम्ही आहोत” असं जगाला सांगणारी लढाई होती.

महार सैनिकांनी दिलेला पराक्रम…
त्यांचं धाडस…
त्यांचा त्याग…

हे सगळं फक्त इतिहासातलं पान नाही—
ते आजही जिवंत आहे, आणि ते जिवंत ठेवणारी लोकंही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या स्थळाला दिलेली ऐतिहासिक प्रतिष्ठा आजही तशीच टिकून आहे.
त्यांच्यामुळे हे फक्त “battle site” राहिलं नाही…
तर समानता, स्वाभिमान आणि सामाजिक जागृतीचं केंद्र बनलं.


2026 ची Ground Reality – “मी प्रत्यक्ष जे पाहिलं”

काही लोकांना वाटतं—
भीमा कोरेगाव = तणाव
भीमा कोरेगाव = राजकारण
भीमा कोरेगाव = वाद

पण मी जे पाहिलं… ते वेगळंच होतं.

✔️ व्यवस्थित सुरक्षा
✔️ लोकांच असलेल प्रेम
✔️ अभिमानाच वातावरण
✔️ लोकांच समाजासाठी योगदान
✔️ दूर-दूरहून आलेले लोक

माझ्या जवळ महाराष्ट्रच्या कोपऱ्यातून, कर्नाटकातून, उत्तर भारतातून, सगळीकडून आलेले लोक भेटले.
कोणी मुलांना घेऊन आले होते – इतिहास शिकवण्यासाठी.
कोणी स्वतःच्या ओळखीशी जोडण्यासाठी.
कोणी समाजासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.

एक १७ वर्षांचा मुलगा म्हणाला —

“मी इथे आलोय कारण मला माझा इतिहास माहिती हवा आहे. कुणी सांगितलेला नाही—मी स्वतः पाहिलेला हवा.”

हे ऐकल्यावर वाटलं…
या ठिकाणाचं भवितव्य सुरक्षित आहे.

पण एक सांगण आहे, या ठिकाणाचं महत्व हे कधीच कमी होऊ देता कामा नये…फक्त १ जानेवारी पुरतच हे ठिकाण मर्यादित न करता, याची आठवण आणि शिकवण वर्षभर केली पाहिजे.


भावना, संस्कृती आणि एकतेचा उत्सव

इथे फक्त लोक नव्हते…
इथे भावना होत्या… संस्कृती होती… आत्मसन्मान होता.

झेंडे उंचावलेले
अभिमानाची गाणी
बाबासाहेबांचे विचार
आजी-आजोबा, तरुण, महिला, लहान मुले – सगळे

इथे एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा आहे.
ही ऊर्जा “रागाची” नाही…
ही ऊर्जा “हक्काची” आहे.


माझ्या मनात उमटलेल्या जाणिवा

मी तिथून परत येताना माझ्यात खूप काही बदललेलं होतं.

इतिहास फक्त पुस्तकात नाही, तो जिवंत असतो
स्वाभिमान वारशाने नाही, लढाईने मिळतो
समाजाला समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या भावनांच्या जवळ जावं लागतं
भीमा कोरेगाव म्हणजे वाद नाही—तो जाणीवेचा स्तंभ आहे

माझ्यासाठी 1 जानेवारी 2026 हा फक्त दिवस नव्हता—
तो माझ्या आयुष्यातला स्मरणात राहणारा अनुभव बनला.

आणि हो…
या सगळ्यात ITIHASIKA07 ची ओळख अजून मजबूत झाली.
इतिहास सांगायचा असेल… तर तो मानवी रूपात सांगायला हवा.
म्हणूनच हा लेख तुमच्यासमोर आहे.


संतुलित दृष्टिकोन – “वाद, राजकारण आणि गैरसमज… आणि माझं मत”

हो, वाद झाले.
हो, राजकीय चर्चा होतात.
हो, वेगवेगळे विचार आहेत.

पण एक गोष्ट मात्र नक्की, एकीच बळ खूप मोठ असत. म्हणून तिथ मी बघितलेल्या जेवढ्या वेगवेगळ्या संघटना, पार्ट्या, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी सर्वांनी जरी आंबेडकरवादी विचारसरणीत काम करत असले तरी एकत्र नाहीत म्हणून आपण कुठे तरी कमी पडतोय अस मला वाटते.

पण एक सत्य बदलत नाही
इथे लाखो लोक श्रद्धेने, आदराने, शांततेने येतात.

भीमा कोरेगावला केवळ politics मध्ये अडकवून बघणं चूक आहे.
हे ठिकाण समाजाच्या जखमांवर पट्टी बांधणारं ठिकाण आहे…
नवीन उभारी देणारं ठिकाण आहे.

५०० महारांच्या पराक्रमाची आठवण करून देणारे चित्र- ITIHASIKA07
५०० महारांच्या पराक्रमाची आठवण करून देणारे चित्र- ITIHASIKA07

निष्कर्ष – “हा दिवस माझ्या आयुष्याचा कायमचा भाग झाला…”

त्या दिवशी Vijay Stambh पासून मागे वळताना माझ्या अंतःकरणाने त्या भूमीला नमस्कार केला.
मनात एकच भावना होती —

“हा इतिहास फक्त वाचायचा नाही… जपायचाही आहे.”

1 जानेवारी 2026 —
मी पाहिलेला भीमा कोरेगाव,
मी अनुभवलेली माणसं,
मी जाणवलेला अभिमान…

हे सगळं माझ्या आयुष्यात कायम राहणार आहे.

आणि मी ठरवलं —
जशी जबाबदारी सैनिकांनी निभावली…
तशीच जबाबदारी इतिहास सत्यतेने पोहोचवण्याची ITIHASIKA07 पार पाडत राहील.


FAQs

1️⃣ भीमा कोरेगाव का महत्त्वाचं आहे?

कारण इथे 1818 मध्ये झालेल्या युद्धाने स्वाभिमान, सामाजिक ओळख आणि समानतेचा एक मोठा संदेश दिला.

2️⃣ 1 जानेवारीला इतकी लोकं का येतात?

कारण हा फक्त स्मरणदिन नाही—तो ओळखीचा दिवस आहे.

3️⃣ 2026 ला वातावरण कसं होतं?

शांत, शिस्तबद्ध, आदरपूर्ण आणि अभिमानाने भरलेलं.

4️⃣ भीमा कोरेगाव फक्त एका समाजासाठी आहे का?

नाही. हा इतिहास सगळ्या भारताचा आहे, ही जाणीव सगळ्यांसाठी आहे.


शेवटचं शब्द

जर तुम्हालाही इतिहास फक्त वाचायचा नसेल…
तर एकदा भीमा कोरेगाव नक्की पाहा.
तेव्हा कळेल—
काही ठिकाणं “भूगोलात” नसतात… ती “भावनांमध्ये” असतात.

– ITIHASIKA07 💙


जर तुम्हाला हा लेख आवडला असेल,
▶ Itihasika07 ला Follow करा
▶ ही पोस्ट इतरांपर्यंत पोहोचवा
▶ आणखी अशा प्रेरणादायी कथा वाचा