
मित्रांनो, आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलतोय, ज्या नावानं इतिहास उजळून निघतो… ज्यांच्या धैर्यानं संपूर्ण समाजाला दिशा मिळाली… आणि ज्यांच्या संघर्षामुळे लाखो महिलांच्या आयुष्याला नवीन अर्थ मिळाला — त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. त्यानिमित्त आपण सावित्रीबाई फुले यांची माहिती आपण या itihasika07 च्या लेखात जाणून घेणार आहोत.
आज त्यांची जयंती आहे… आणि म्हणूनच हा लेख फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर त्या महान स्त्रीसमोर आपलं मस्तक झुकवण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी आणि नवं काहीतरी शिकण्यासाठी आहे.
त्या कोण होत्या, हे सांगायला शब्द कमी पडतात…
आपण आज शिक्षण घेतो, मुली कॉलेजला जातात, करिअर करतात, आत्मविश्वासानं जगतात… पण कधीतरी या भारतभूमीत असा काळ होता, जेव्हा मुलींना शिक्षण तर दूर… घराबाहेर पडायलादेखील परवानगी नव्हती.
समाज रूढीवादी होता, परंपरांच्या नावावर अन्याय होत होता, आणि अंधश्रद्धांनी श्वास गुदमरला होता.
आणि अशा काळात जन्माला आली एक क्रांती. एक धैर्य. एक विद्रोह.
ती होती — सावित्रीबाई ज्योतीराव फुले.
३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला.
वडील – खांडोजी नेवसे पाटील
आई – लक्ष्मीबाई नेवसे पाटील
तेव्हा समाजात स्त्रियांना शिक्षण देणं तर दूरच, स्त्रियांना माणूस म्हणून स्थान मिळणंही कठीण होतं. अशा काळात, जगण्यापेक्षा “समाज बदलण्याचं स्वप्न” मोठं मानणारी ही स्त्री जन्माला आली.
त्या स्वतः शिकल्या, शिकल्या आणि मग संपूर्ण भारताला शिकवलं. विरोध सहन केला, अपमान सहन केला, पण मागे फिरल्या नाहीत. म्हणूनच आज आपण त्यांना फक्त “शिक्षिका” म्हणत नाही… आपण त्यांना म्हणतो —
“क्रांतीज्योती”
विवाह आणि नव्या आयुष्याची सुरुवात
सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या सुमारे ९ व्या वर्षी महात्मा जोतिराव फुले यांच्यासोबत झाला.
जोतिराव स्वतः शिकलेले आणि प्रबुद्ध विचारांचे असल्यामुळे त्यांनीच सावित्रीबाईना वाचायला-लिहायला शिकवलं. एक स्त्री शिकली तर… ती कित्येक पिढ्या उजळवते – या विचाराला त्यांनी साथ दिली आणि सावित्रीबाईंच्या हातात ज्ञानाची कवाडं उघडली.
सहन केलेला अपमान… पण न झुकलेलं मस्तक!
आपण आज सोशल मीडियावर पोस्ट करतो, भाषणं करतो, महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतो… पण त्या काळात कुणी असं काही केलं तर काय व्हायचं?
दगड मारले जायचे… चिखल फेकला जायचा… समाजाकडून शिव्या मिळायच्या… लोक हिनवायचे… पण त्या तरीही शाळेत जायच्या!
दररोजचा संघर्ष म्हणजे त्यांचं आयुष्य
त्या शाळेत जाताना अंगावर चिखल पडू नये म्हणून त्यांच्याकडे दोन साड्या असायच्या. एक खराब झाली, तर दुसरी घालून शिकवण सुरूच…
हे फक्त वाचून थक्क व्हायला होतं… पण त्यांनी हे जगून दाखवलं!
आणि इथेच मला असं वाटतं की आजची मुलगी हसून म्हणू शकते —
“मी शिक्षण घेऊ शकते कारण माझ्या क्रांतीज्योती सावित्रीमाईने शिक्षणाच्या अंधाऱ्या रस्त्यात दिवा पेटवला होता.”
भारताच्या पहिल्या मुलींच्या शाळेची सुरुवात
आज आपण “School Admission Open” पाहिलं की आनंद होतो. पण त्या काळात कोणी “मुलींसाठी शाळा सुरू केली” म्हटलं तर तो गुन्हा समजला जायचा!
आणि हा “गुन्हा” केला… सावित्रीबाईंनी आणि जोतिराव फुल्यांनी.
विचार करून बघा ना!
किती त्या वेदना? किती तो अपमान? किती त्यामागचा संघर्ष! – विचार करताच अंगावर काटा आला ना! म्हणून त्यांचा संघर्ष डोळ्यासमोर ठेऊन नव्याने पेटून उठा आणि शिक्षण घ्या.
भारतातील पहिली मुलींची शाळा – इतिहास घडला!
१८४८ साली पुण्यात भिडे वाड्यात
भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली
आणि या शाळेच्या पहिल्या शिक्षिका बनल्या – सावित्रीबाई फुले {source: wikipedia}
या कामात फातिमा शेख यांची साथ विशेष होती.
सावित्रीबाई + जोतिराव + फातिमा शेख
हा स्त्री-पुरुष-समानतेचा आणि मानवतेचा अभूतपूर्व संगम होता.
पुण्यात पेटविली पहिली शिक्षणाची मशाल
पुण्यात पेटवलेली ही शिक्षणाची मशाल म्हणजे फक्त शाळेची सुरुवात नव्हती… ती होती समाजबदलाची सुरुवात. त्या काळात मुलींना शिक्षण देणं हा मोठा अपराध मानला जायचा, लोक विरोध करायचे, शिव्या द्यायचे, दगड–चिखल फेकायचे. पण तरीही सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिराव फुले यांनी हार मानली नाही. पुण्यात भिडे वाड्यात त्यांनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. ही शाळा म्हणजे मुलींसाठी उघडलेला पहिला दरवाजा, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रज्वलित केलेला पहिला दिवा आणि स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची खरी सुरुवात होती. त्या एका पावलानं भारतीय समाजाच्या इतिहासात शिक्षणाचा अमर असा प्रकाश निर्माण केला.
इथूनच सुरुवात झाली — स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची.
म्हणून हाच संघर्ष डोळ्यासमोर ठेऊन महिलांनी/मुलींनी शिक्षणापासून वंचित न राहता, शिक्षण घेऊन समाज्यापुढे आपली ओळख निर्माण करून सावित्रीमाई यांच्या कार्याला सलामी दिली पाहिजे.
शिक्षणासोबत मानवतेची शाळा
त्यांचं कार्य फक्त शाळेपुरतंच नव्हतं.
अन्यायाविरुद्ध आवाज, विधवा पुनर्विवाहाचा समर्थन, अनाथांसाठी आधार, समाजासाठी जिवाचं रान.
आईसारखी माया, क्रांतीसारखं धैर्य होत क्रांतीज्योतीच
महामारीच्या काळात लोक दूर पळत होते… पण त्या मात्र आजारी माणसांची सेवा करत होत्या.
सेवा करताना त्यांना आजार झाला आणि…
त्यांनी प्राण दिला… पण “मानवतेची शिकवण” देऊनच जग सोडलं.
समाजाचा विरोध – आणि सावित्रीबाईंचं धैर्य
तेव्हा मुलींना शिकवणं म्हणजे “पाप” मानलं जायचं.
लोक दगड मारायचे, चिखल फेकायचे, शिव्या द्यायचे…
पण सावित्रीमाई काय म्हणायच्या?
“मी शाळेत जातेय… कारण माझ्या समाजाचं भविष्य शाळेत आहे.”
त्यांच्या अंगावरती दगडांचा मारा झेलत त्या रोज शाळेत जायच्या…
कारण सावित्रीमाई फक्त स्त्री नव्हत्या,तर त्या जगाच्या पाठीवर एक “क्रांती” होत्या!
विधवा स्त्रिया, मुली आणि दुर्लक्षितांसाठी महान काम
त्या केवळ शिक्षणापुरत्याच थांबल्या नाहीत. त्यांनी:
✔ विधवांसाठी आधार निर्माण केला
✔ लहान मुलींच्या संरक्षणासाठी लढ्या दिल्या
✔ सतीप्रथेविरोधी चळवळ समर्थित केली
✔ मुलींना वाचण्याचा, जगण्याचा हक्क दिला
१८६३ मध्ये, फुले दाम्पत्याने त्यांचे जुने मित्र सदाशिव बल्लाळ गोवंदे यांच्यासोबत “बालहत्या प्रतिबंधक गृह ” सुरु केले.1
जिथे अनाथ, विधवा आणि सोडून दिलेली मुलं वाढवली जात.
प्लेग महामारीत सेवा आणि बलिदान
१८९६-९७ मध्ये पुण्यात प्लेगचा प्रकोप झाला.
लोक भयभीत झाले, मृत्यूच्या छायेत जगू लागले.
अशा वेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि त्यांचा दत्तक मुलगा यशवंतराव फुले यांनी
प्लेगग्रस्तांना वाचवण्यासाठी सेवा केंद्र सुरू केलं.
रुग्णांना स्वतः उचलून, त्यांना आधार देऊन, त्यांच्या जिवासाठी लढताना
त्या स्वतः संक्रमित झाल्या…
आणि
१० मार्च १८९७ रोजी त्याच प्लेग च्या आजारामुळे आपल्य्यातून निघून गेली.
मानवतेची आई, स्त्रीशिक्षणाची पहिली ज्योत…
आपल्यातून गेली.
आज आपण त्यांना का आठवतो?
कारण त्या इतिहास नाहीत… त्या प्रेरणा आहेत.
आजही जर एखादी मुलगी शिक्षणासाठी पुढं जाते, जर एखादी स्त्री अन्यायाविरुद्ध उभी राहते… तर त्यामागे सावित्रीबाईंची सावली असते.
आजही महाराष्ट्रात, भारतात आणि जगभरात त्यांचं नाव घेतलं जातं आणि तेव्हा वाटतं —
“हो… ही क्रांती अजून जिवंत आहे.”
आजच्या महिलांसाठी हा संदेश
माझ्या बहिणींनो… मातांनो…
तुम्ही फक्त घरापुरत्या नाही… तुम्ही शक्ती आहात खरोखरचं, बुद्धी आहात, धैर्य आहात!
शिक्षण हा तुमचा अधिकार आहे, स्वाभिमान तुमची ओळख आहे, आणि स्वातंत्र्य तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे.
आज आपण जर क्रांतीज्योती सावित्रीबाईंची जयंती साजरी करत असू, तर फक्त पोस्ट, फोटो, स्टेटस यापुरतंच मर्यादित राहू नका…
त्यांच्या विचारांना आयुष्यात उतरवा.
त्यांचं महान वारस
आज आपण ज्या स्वातंत्र्याने बोलतो
मुली ज्या अभिमानाने शिकतात
स्त्रीला जे हक्क मिळाले…
त्यांच्या लढ्यामुळे!
त्या फक्त व्यक्ती नव्हत्या –
त्या एक विचार होत्या… एक क्रांती होत्या… आणि एक प्रेरणा आहेत!
itihasika07 कडून विशेष वंदन
इतिहास सांगताना केवळ शब्द नकोत… भावना हव्यात बरोबर ना?
आणि म्हणूनच itihasika07 हा प्लॅटफॉर्म नेहमीच इतिहासाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो.
itihasika07 चं उद्दिष्ट —
✔ इतिहासाचा सन्मान
✔ सत्याचा गौरव
✔ आणि प्रेरणेची ज्योत कायम पेटती ठेवणं हा आहे.
आजच्या या पोस्टमधून itihasika07 आपल्या सर्व वाचकांच्या वतीनं सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करतो.
त्यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा आपण पुढे नेऊ — हीच खरी जयंती असेल!
समारोप – क्रांती कधीच संपत नाही…
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाकडे पाहिलं की जाणवतं —
क्रांती म्हणजे केवळ तलवार नाही…
क्रांती म्हणजे फक्त पुस्तकही असतं!
क्रांती म्हणजे आवाज, धैर्य, प्रेम, माया आणि समता!
आज आपण हात जोडून म्हणूया —
“क्रांतीज्योती, तुमची ज्योत आम्ही विझू देणार नाही!”
आणि त्याच त्याच्या विचारांना अनुसरून itihasika07 म्हणते,
FAQs
प्र.१ – सावित्रीबाई फुले जयंती कधी साजरी केली जाते?
उत्तर: दरवर्षी ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाते.
प्र.२ – सावित्रीबाई फुले यांना क्रांतीज्योती का म्हणतात?
उत्तर: त्यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले, जात-भेद, अपमान, विरोध सहन करत समाजात मोठा बदल घडवला म्हणून त्यांना क्रांतीज्योती म्हटले जाते.
प्र.३ – सावित्रीबाई फुले यांनी कोणती पहिली शाळा सुरू केली?
उत्तर: त्यांनी पुण्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली.
प्र.४ – सावित्रीबाई फुले यांचे प्रमुख कार्य कोणते?
उत्तर: स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्विवाह, अनाथांची सेवा, सामाजिक न्याय व समतेसाठी लढा.
प्र.५ – सावित्रीबाई फुले महिला सक्षमीकरणासाठी कशा महत्त्वपूर्ण ठरल्या?
उत्तर: त्यांनी महिलांना शिक्षण, स्वाभिमान आणि समानतेचा अधिकार मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.
शेवटी एवढंच —
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, प्रेरणा मिळाली असेल, तर हा संदेश पुढे पोहोचवा.
आपल्या मुलींना, विद्यार्थ्यांना, समाजाला ही खरी प्रेरणा द्या…
कारण इथून पुढं आपणच —
नव्या इतिहासाचे वाहक आहोत!
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल,
▶ Itihasika07 ला Follow करा
▶ ही पोस्ट इतरांपर्यंत पोहोचवा
▶ आणखी अशा प्रेरणादायी कथा वाचा


